Posts

जीवन प्रवास

                  जीवनाच्या प्रवासात                 अनेक माणसे भेटतात,                     काही आपल्याला                         साथ  देतात     काही सोडून निघून जातात............!!                                                   ---   वर्षा  पुजारी -क्षीरसागर 

पुन्हा मी माझी

            पुन्हा मी माझी                          मी  कमी   बोलले  म्हणून                         शब्द कागदावर उतरतात                          बोलायला गेले तर                       वेडे ओठांतुनच परतता                तुला डोळे भरून पाहायचं असते           पण तुला पाहिले की डोळेच भरून येतात                    आणि बोलायचे म्हणले की               शब्दच मुकेपणा धरून बसतात..........!                                                  ...

नाती.......!

  नाती ही झाडाच्या पानासारखी असतात एकदा का तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते............!

" स्वावलंबी शिक्षणाचे उद्गात "

                  " स्वावलंबी शिक्षणाचे उद्गात "  कर्मवीर भाऊराव पाटील 'स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय आणि स्वातंत्र्य' हीच खरी शैक्षणिक तत्त्वज्ञानाची चतु:सूत्री मानणारे 'कर्मवीर भाऊराव पाटील यांना थोर शिक्षणतज्ज्ञच म्हटले पाहिजे. 'कमवा आणि शिका' असा अतिशय सोप्या भाषेत शिक्षणाचे मर्म सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारे कर्मवीर एक श्रेष्ठ समाजसुधारकही आह कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज गावी २२ सप्टेंबर १८८७ ला  जन्मलेले हे बालक बालपणापासून हट्टी स्वभावाचे होते. वडील सरकारी नोकरीत, त्यामुळे वडिलांसोबत भाऊरावांच्या पायालाही भिंगरी लागलेली. परंतु भाऊरावांचे मामा हे पैलवान, त्याचा मित्र सत्याप्पा हा तर शूर साहसी अन् त्याबरोबर दयाळू अन् गरिबांचा वाली. तो श्रीमंताकडून मिळालेले पैसे गोरगरिबात वाटून टाकत असे. त्याच्या चातुर्याच्या, हिमतीच्या चांगुलपणाच्या गोष्टींचा प्रभाव भाऊरावांवर चांगलाच होत होता. अन्यायाविरुद्ध बंड करण्याचे बाळकडू त्यांना लहानपणीच सत्याप्याकडून मिळाले होते. भाऊरावांचे शिक्षण बेता...

क्रांतीज्योती सावित्रीबाई

  *꧁क्रांतीज्योती सावित्रीबाई꧂* ======❀======  *उजळली अंधाराची रात्र*  *प्रकाशला आशेचा किरण*  *विळखा कर्मठ विचारांचा*   *महिले पदी असे* *साखळदंड!*   *केली चळवळ शक्ती देवतेची*                            *तेजाने प्रज्वलित केली दीपमाळ*     *दृष्टी देऊनी शिक्षणाची* *सज्ञानाचा झाला* *दीपस्तंभ!*   *सती झाली सामर्थ्यवान सबला*   *क्रांतीबा पाठी उभे दूत*   *क्रांतिज्योती ची उभी साथ*  *बहुजनांना घातली साद!*      *माणसातला माणूस*   *केला पुरोगामी विचारवंत*   *माणसातला माणूस*   *झाला मुक्त दिर्घश्वास!!*   *क्रांतिज्योती* *सावित्रीबाई फुले यांना विनम्र* *अभिवादन*💐💐

आयुष्य

  एवढ्याशा आयुष्यात खूप काही हवं असतं पण हवं असतं तेच मिळत नसतं हवं तेच तेच मिळालं तरी खूप काही कमी असत चांदण्यांनी भरून सुध्दा आपलं आभाळ नेहमी रिकामं असतं……..